- विकासाची ग्वाही देत महिला सर्वसाधारण गटातून भरला मंगळवारी उमेदवारी अर्ज…
संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ३१ डिसेंबर २०२५) :- रहाटणी–तापकीरनगर प्रभाग क्रमांक २७ मधून अर्चनाताई विनोद तापकीर यांना भारतीय जनता पक्षाकडून महिला सर्वसाधारण गटातुन अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. मंगळवारी (दि. ३०) रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

प्रभागाच्या विकासात त्यांनी आतापर्यंत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि स्वच्छता उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय भूमिका बजावली आहे. पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा, कचरा व्यवस्थापन, महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच सार्वजनिक सोयी-सुविधांचा विस्तार या मुद्द्यांवर त्यांनी स्वतः पुढाकार घेत सुधारणांचे जाळे विणले आहे. या कामाची दखल घेऊन पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली.
अर्चनाताईंचे पती विनोद तापकीर हे सामाजिक कार्यकर्ते असून, गरीब आणि गरजूंना वैद्यकीय मदत, शैक्षणिक सहाय्य व विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम ते अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यामुळे या कुटुंबाचा प्रभागाशी जवळचा संपर्क राहिला आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षाच्या शक्तीप्रदर्शनासोबतच घरोघरी संपर्क अभियान सुरू आहे. विकासाचा ध्यास आणि स्वच्छ प्रशासनाचा संकल्प मांडत अर्चनाताई विनोद तापकीर या निवडणुकीत मतदारांचा विश्वास संपादन करून विजयी होतील, अशी चर्चा प्रभागात सुरु आहे












