न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- दीड महिन्यापासून आम्हाला दषित पाणीपुरवठा होत आहे. संबंधित विभागाच्या कर्मचा-यांना सांगूनही ते दुर्लक्ष करीत आहेत. हे पाणी पिऊन लेकरबाळ आजारी पडत आहेत. आमचा जीव गेल्यावरच महापालिका प्रशासनाला जागा येणार का? असा संतप्त सवाल महात्मा फुलेनगरमधील हिराबाई लांडगे परिसरातील संतप्त महिला करत आहेत.
आम्ही झोपडपट्टीत राहतो म्हणून आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संबंधित महिलांनी केला आहे. वायसीएम रुग्णालयाच्या मागे प्रभाग क्र. २० मध्ये हिराबाई लांडगे परिसरातील साठ ते सत्तर झोपड्यांना गेल्या दीड महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे.
नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचा-यांकडे तक्रार केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पाईपलाईनमध्ये किती ठिकाणी गळती आहे. याचा अंदाज येत नाही. तरीही गळती शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.











