न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीत तब्बल १३० सार्वजनिक उद्याने आहेत. तसेच शहरात आणखी आठ सार्वजनिक उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. त्यातून शहरात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेची शहरातील सर्वच भागात लहान मोठी अशी एकूण १७८ उद्याने आहेत. १३० हे सार्वजनिक उद्याने असून, उर्वरित रुग्णालय, स्मशानभूमी, कार्यालय अशा ठिकाणी आहेत.
पालिकेच्या वतीने आणखी आठ उद्याने विकसित करण्याचे नियोजन आहे. मोशी, चिखलीतील जाधववाड़ी व एसटीपी केंद्र, बोपखेल, दापोडी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड या ठिकाणी ही उद्याने तयार केली जाणार आहेत.











