न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- गाडीतील पेट्रोल संपल्यामुळे एकजण पंपावर प्लास्टिक बाटलीत पेट्रोल घेण्यासाठी पंपावर आला होता. त्याला गाडी घेऊन येण्यास सांगण्यात आले. त्यामुळे रावेत येथुन दुचाकी ढकलत त्याला येथे यावे लागले. गाडीत शंभर रूपयाचे पेट्रोल टाकुन तो पंपाच्या बाहेर आला. संशय आल्यामुळे त्याने गाडीतील पेट्रोल पुन्हा बाटलीत काढले ते पाऊण लिटरही नसल्याचे त्याच्या लक्षात आले. या संपूर्ण घटनाक्रमाचे मोबाईलवर चित्रीकरण केले आणि ते सोशल मिडीयावर व्हायरल केले.
या व्हिडीओची दखल घेऊन, देहूरोड विकास समितीने सोमवारी रणरणत्या उन्हात समितीच्या पदाधिका-यांनी पुरवठा विभागाची रितसर परवानगी घेऊन समितीच्या वतीने सोमवारी मोर्चां काढण्यात आला. या आंदोलनामुळे पंपावर काहीकाळ पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आला होता. पोलीसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पंपाचे मालक सुनिल शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी समितीचे प्रमुख रेव्हरंड डॉ. सोलोमनराज भंडारे, राजू मारिमुत्तू, पंकज तंतरपाळे, बॉबी डिक्का, अमित वाल्मिकी, रमेश पवार, शामराव वाकोडे, योगेश कसबे आदी उपस्थित होते.











