- हलगीच्या नादात रंगलेल्या प्रचारयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
- काळेवाडीचा कायापालट करण्याचा भाजपा उमेदवारांचा निर्धार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ जानेवारी २०२६):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार दिवसेंदिवस जोम धरत आहे. काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबानगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर परिसरात भाजपचे अधिकृत उमेदवार क) गटातून विनोद जयवंत नढे, ड) गटातून हर्षद सुरेश नढे आणि ब) गटातून काळे कोमल सचिन यांच्या संयुक्त पॅनलने प्रचाराची सुत्रे हाती घेतली आहेत.
शुक्रवारी प्रभागात आयोजित प्रचारयात्रेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. मोरया कॉलनी, वैभव कॉलनी आणि सप्तश्रृंगी कॉलनीतून हलगीच्या तालावर निघालेल्या या प्रचारयात्रेमुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार झाले. कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचाराचा जोश सातत्याने वाढताना दिसत आहे.
विनोद नढे यांच्या भाजप प्रवेशानंतर प्रभागात विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोरदारपणे होत आहे. रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, उद्याने आणि स्थानिक सुविधा या मुद्द्यांवर भर देत ‘काळेवाडीचा कायापालट’ करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला. पक्षाच्या धोरणांवर विश्वास ठेवून नागरिकांनी साथ दिल्यास आगामी काळात सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
प्रत्येक सोसायटी, काॅलनी आणि घरोघर संपर्क, कोपरा सभा आणि संवाद कार्यक्रम घेऊन भाजपचा प्रचार आणखी वेगाने राबविण्याची माहिती पॅनलकडून देण्यात आली. प्रभागात विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.












