सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ फेब्रुवारी २०२६) :- चिंचवडगावातील गांधी पेठ परिसरात सोन्याच्या अपहाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, सुमारे २२ लाख रुपयांच्या सोन्याची अफरातफर केल्याप्रकरणी कामगाराला अटक करण्यात आली आहे.
चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार २ एप्रिल २०२५ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गांधी पेठ येथील प्रियांका ज्वेलर्स येथे घडल्याची माहिती आहे.
देवेश कैलाश वर्मा (वय २७, व्यवसाय ज्वेलर्स, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी श्रीमंता संतोष समांता (वय ४३) हा प्रियांका ज्वेलर्स दुकानाच्या चौथ्या मजल्यावर राहत असून मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीकडे सोने वितळवण्यासाठी विश्वासाने दिले होते. मात्र त्या सोन्यातून सुमारे २४५ ग्रॅम, अंदाजे २२,०५,००० रुपये किमतीचे सोने आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेत अपहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बळीप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











