- शंकरभाऊंच्या विकासाच्या ‘व्हिजन’मुळे रचणार ‘विकासाचा नवा अध्याय’ – हर्षद नढे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०५ जानेवारी २०२६) :- “तरुणांना कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी; मध्यमवर्गाला सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सेवा हेच आमचे पुढील पायाभूत ध्येय आहे. सुसज्ज रस्ते, पार्किंग, सार्वजनिक वाहतूक आणि डिजिटल सुविधा प्राधान्याने उभारू. त्यासाठी येत्या १५ तारखेला कमळ चिन्हाला मतदान करून प्रभाग क्रमांक २२ मधील चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करा,” असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २२ (काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर) मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अ) पाडळे निता विलास, ब) कोमलताई सचिन काळे, क) विनोद जयवंत नढे आणि ड) हर्षद सुरेश नढे यांच्या प्रचारासाठी रविवारी (दि. ०५) रोजी भव्य भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी मतदारांशी हितगुज साधताना आमदार शंकर जगताप बोलत होते. प्रचाराला रविवारी वेग आला. ज्योतिबा गार्डन परिसरातून प्रारंभ झालेल्या पदयात्रेत हजारोंच्या उपस्थितीत घोषणाबाजीचा जल्लोष रंगला. ग्रामदैवत पंचनाथ महाराजांचे दर्शन घेऊन यात्रेला शुभारंभ झाला आणि मार्गभर फुलांची उधळण झाली. प्रभागातील अधिकृत उमेदवार हर्षद सुरेश नढे यांना केंद्रस्थानी ठेवून झालेल्या पदयात्रेत नागरिकांनी हिरारीने सहभाग घेतला.












