न्युज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०६ जानेवारी २०२६):- येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील अध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थीनी रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिरात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. संस्थेच्या खजिनदार डॉ भूपाली शहा यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आरोग्य समितीच्या वतीने हा उपक्रम प्रतिभा महाविद्यालयात राबविण्यात आला . भोसरी येथील रेड प्लस ब्लड बॅकेचे डॉ इंदर जैस्वाल , प्रवर्तक डॉ . पी के शिंदे , डॉ मुजम्मील उस्मानी, सपना शिंदे , डॉ सेजल आदीनी रक्त , मधूमेह , सी. बी. सी ., तोंडाचे कॅन्सर , थायरॉईड, ईसीजी , रक्तगट तपासणी केली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक उपस्थित मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सर्व विभाग प्रमुख , कार्यक्रम समन्वयक, अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच स्वयंसेवकांचे मौल्यवान अनमोल सहकार्य लाभले.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा, डॉ भूपाली शहा, संचालिका डॉं तेजल शहा यानी आरोग्य समिती समवेत प्रभारी प्राचार्या डॉ क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया समवेत आरोग्य तपासणी शिबिराला यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या व सहकार्य केलेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले . तुमची उपस्थिती व प्रोत्साहन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, आणि इतका उत्तम प्रतिसाद मिळाल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे अशा शब्दात संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा यानी कौतुक करुन ते पुढे म्हणाले , तूम्ही सर्व जण आपल्या आरोग्याला व कल्याणाला प्राधान्य दिल्याबद्दल तूमचे प्रत्येकाचे धन्यवाद मानतो.
विभाग प्रमुख डॉ श्रुती गणपुले , उपप्राचार्या व समन्वयीका डॉ. जयश्री मुळे, प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी , मुख्य संयोजीका डॉ. चारुशिला पाटील, आरोग्य समिती प्रमुख व एन.एस.एस चे कार्यक्रम अधिकारी प्रा सुकलाल कुंभार आणि प्रा सुप्रिया गायकवाड यांनी विशेष परीश्रम घेतले.












