- प्रचाराच्या ‘सुपर संडे’ तील पदयात्रेला काळेवाडीतील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद..
- विश्वास ठेवा, प्रभागात नक्कीच बदल घडवून आणू – कोमलताई सचिन काळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०५ जानेवारी २०२६) :- “घर-परिसर सुरक्षित झाला तरच समाजाचा विकास घडतो. महिलांचे सक्षमीकरण, मुलींसाठी शिक्षण-सुरक्षा, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आणि ज्येष्ठांसाठी सुविधायुक्त सार्वजनिक ठिकाणं या सगळ्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. येत्या १५ तारखेला कमळ चिन्हाला मतदान करून चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करा,” असे आवाहन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्र. २२ (काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर) येथे महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपचे अधिकृत उमेदवार अ) पाडळे निता विलास, ब) कोमलताई सचिन काळे, क) विनोद जयवंत नढे आणि ड) हर्षद सुरेश नढे यांच्या प्रचारासाठी रविवारी (दि. ०५) रोजी प्रचाराच्या ‘सुपर संडे’चे निमित्त साधून भव्य भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मतदारांना संबोधित करताना आ. जगताप बोलत होते.
ज्योतिबा गार्डन परिसरातून पदयात्रेला प्रारंभ झाला. ग्रामदैवत पंचनाथ महाराजांचे दर्शन घेत पुढे मार्गक्रमण झाले, तर ठिकठिकाणी फुलांची उधळण आणि घोषणाबाजीने वातावरण रंगतदार झाले. पदयात्रेत नागरिकांनी भाजपाला मोठा प्रतिसाद देत विकासासाठी एकजुटीचा संदेश दिला.
कोमलताई सचिन काळे म्हणाल्या, “महिलांसाठी स्वयंसाहाय्य गट बळकट करणे, प्रभागातील प्रत्येक कॉलनीत पाणी, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते, प्रकाशयोजना, तसेच तरुणांसाठी कौशल्यविकास केंद्र हा आमचा प्राथमिक अजेंडा आहे. तरुणांच्या रोजगारनिर्मितीसाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत. विश्वास ठेवा, प्रभागात नक्कीच बदल घडवून आणू.”












