- चंद्रकांत नखाते यांच्या पुढाकाराला नागरिकांची साथ..
- कमळाला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून प्रभाग क्रमांक २७ रहाटणी, श्रीनगर, तापकीरनगर या भागात रविवारी भाजपचा प्रचार जोरदार रंगला. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार ड) चंद्रकांत (आण्णा) नखाते, क) अर्चना विनोद तापकीर यांच्या नेतृत्वाखाली मथुरा कॉलनी, तांबे शाळा परिसर, दत्तनगर, नखाते नगर आणि गजानन नगर भागात व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्यात आली.
रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत झालेल्या या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागरिकांशी संवाद साधताना चंद्रकांत (आण्णा) नखाते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासदृष्टिकोनातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा चेहरा बदलला आहे. आता आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, प्रकाशयोजना आणि वाहतूक व्यवस्थेवर आम्ही परिणामकारक काम करणार आहोत. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण—सर्व घटकांसाठी उपयुक्त सुविधा उभारू.”
नखाते पुढे म्हणाले, “कामे पारदर्शक पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करणे ही आमची बांधिलकी आहे. येत्या निवडणुकीत कमळ चिन्हाला भरघोस मतदान करून आम्हाला विजयी करा, आम्ही विकास वेगाने घडवून आणू.”












