- रहाटणीत अर्चनाताई विनोद तापकीर यांच मतदारांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०५ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २७ रहाटणी, श्रीनगर, तापकीरनगर येथे रविवारी प्रचाराला हटके रंग चढला. भाजपच्या अधिकृत उमेदवार क) अर्चना विनोद तापकीर यांच्यासह ड) चंद्रकांत (आण्णा) नखाते यांच्या पुढाकारातून मथुरा कॉलनी, तांबे शाळा परिसर, दत्तनगर, नखाते नगर आणि गजानन नगर भागात प्रचारावर जोर देण्यात आला.
मतदारांशी गप्पा मारताना अर्चनाताई तापकीर म्हणाल्या, “प्रभाग फक्त दिसायला नाही तर जगायलाही सोयीचा हवा. स्वच्छ रस्ते, नियमित पाणी, महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि तरुणांसाठी संधी निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे. प्रचारदरम्यान महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी आपले प्रश्न मांडले आणि त्यांची नोंद घेण्यात आली. प्रत्येक कामात पारदर्शकता आणि वेळेचे भान ठेवून विकास घडवून आणू.”
शेवटी अर्चनाताईंनी जनतेला आवाहन केले “आपल्या विश्वासाची आम्ही कदर करू. कमळ चिन्हाला भरघोस मतदान करून आम्हाला विजयी करा, आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासात साथ द्या.”












