- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अनिताताई कैलास थोपटे वातावरण पालटणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०९ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला पोषक वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अनिताताई कैलास थोपटे यांच्या प्रचाराला परिसरातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठिंबा दर्शविला आहे.
गुरुवारी अनिताताई कैलास थोपटे यांनी अश्विनीताई चंद्रकांत तापकीर यांच्यासह स्वामी समर्थ मठ, तापकीरनगर, डिव्हाईन डॅझल सोसायटी तसेच हरित शिल्प सोसायटी परिसरात प्रचार फेरी काढली. यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील मूलभूत प्रश्न जाणून घेतले.
प्रभागातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची समस्या, महिला सक्षमीकरण, स्वच्छ व सुरक्षित परिसर आणि नागरिकांसाठी मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर ठोस काम करण्याचा निर्धार अनिताताईंनी व्यक्त केला. “नगरसेवक म्हणजे केवळ निवडणुकीपुरता नव्हे, तर नागरिकांसाठी कायम उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी,” असे त्या म्हणाल्या.
प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांना येत्या १५ जानेवारी रोजी घड्याळ चिन्हावर मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.












