सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- भारतीय जनता युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष जयदीप करपे यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाप्रती आपली नैतिक जबाबदारी ओळखून वाढदिवस अनाथ मुलांबरोबर साजरा केला.
यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, नगरसेवक उदय गायकवाड, महापौर रवी लांडगे यांचे बंधू प्रकाश लांडगे व उद्योजक प्रशांत आहेर, अजिंक्य आहेर, यश करपे, शौर्य करपे व जयदीप करपे मित्र परिवार उपस्थित होते.
मातृछाया बालकाश्रम दिघी येथे आपल्या भाजपा युवा मोर्चाचे सहकारी व मित्र परिवार केक कापून अनाथांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले.
आम्ही यापुढेही येथे येऊ तुम्हाला शक्य ती मदत देऊ, असे सर्वांनी सांगितले.
अना़थ मुलांसोबत वाढदिवस साजरा करणे हा एक अत्यंत भावनिक आणि सामाजिक उपक्रम आहे. यात अनाथाश्रमात केक कापणे, मुलांना फळे व खाऊ देऊन आनंद द्विगुणित करता येतो. मुलांसोबत खेळ, गाणी आणि गप्पागोष्टी करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हा या सोहळ्याचा खरा उद्देश होता.असे जयदीप करपे यांनी सांगितले.











