- विकासाच्या ‘व्हिजन’ला मतदारांची मिळतेय पसंती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०९ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार अनुकूल वातावरणात सुरू असून, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई चंद्रकांत तापकीर यांच्या प्रचाराला परिसरातील मतदारांकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

गुरुवारी अश्विनीताई चंद्रकांत तापकीर यांनी सह-उमेदवार अनिताताई कैलास थोपटे यांच्यासह स्वामी समर्थ मठ, तापकीरनगर, डिव्हाईन डॅझल सोसायटी आणि हरित शिल्प सोसायटी परिसरात प्रत्यक्ष भेटी देत प्रचार केला. घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांनी प्रभागातील समस्या, नागरी सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
प्रभागाचा सर्वांगीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, तसेच युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम हे आपल्या व्हिजनचा भाग असल्याचे अश्विनीताईंनी सांगितले. “नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरून काम करणारी नगरसेविका म्हणून मी सदैव उपलब्ध राहीन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना त्यांनी येत्या १५ जानेवारी रोजी घड्याळ चिन्हावर मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करा, असे आवाहन मतदारांना केले.












