- मतदार म्हणतात, ‘सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध महिला नेतृत्व’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०९ जानेवारी २०२६) :- “महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून विकासकामे केली जातील. निधीचा अपव्यय न करता प्रत्येक कामात गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे पालन केले जाईल,” असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत महिला उमेदवार मोनिकाताई नवनाथ नढे यांनी प्रचारा दरम्यान नागरिकांना केले. नागरिकांच्या अडचणी थेट समजून घेण्यासाठी नियमित जनसंपर्क, वॉर्डस्तरीय संवाद आणि खुले चर्चासत्र आयोजित केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक २२ मध्ये काळेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार प्रभावीपणे सुरू असून, अधिकृत उमेदवार माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांच्यासह मोनिकाताई नवनाथ नढे यांनी उत्तरदायी, पारदर्शक आणि सर्वसमावेशक विकासाचा संकल्प व्यक्त केला आहे. नागरिकांच्या विश्वासावर आधारित कामकाज हीच आपल्या राजकारणाची ओळख असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
प्रभाग क्रमांक २२ मध्ये औद्योगिक, व्यापारी आणि निवासी भाग एकत्र असल्याने येथील समस्या देखील विविध स्वरूपाच्या आहेत. पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सेवा आणि शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. विकास हा केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्ष नागरिकांच्या जीवनात दिसला पाहिजे, असा विश्वास मोनिकाताईंनी व्यक्त केला.
आरोग्य सुविधांमध्ये मोफत तपासणी शिबिरे, स्वच्छ पिण्याचे पाणी, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, युवकांसाठी क्रीडा व कौशल्य विकास उपक्रम तसेच शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय व लोकाभिमुख विचारधारेनुसार काम करत प्रभाग क्रमांक २२ चा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हावर मतदान करून मी मोनिकाताई नवनाथ नढे आणि पक्षाच्या इतर उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.












