न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- पीडित महिला आणि प्रतिक यांचा २०१५ साली विवाह झाला. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. ती विवाहितेकडून पूर्ण झाली नाही. यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शिवीगाळ व मारहाण करत छळ केला.
पती प्रतिक आणि सासू सुवर्णा यांनी विवाहितेचा वैद्यकीय तपासणीचा बहाणा करून गर्भपात केला. तर दीर प्रणव याने विवाहितेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना डिसेंबर २०१५ ते मे २०१९ या कालावधीत वाकड येथे घडली.
प्रतिक सूर्यकांत कदम (वय ३०), प्रणव सूर्यकांत कदम (वय २४), सुवर्णा सूर्यकांत कदम (वय ५०) आणि सूर्यकांत कदम (वय ६०) अशी गुन्हे दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत. याप्रकरणी ३० वर्षीय विवाहितेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत गुन्हा दाखल केला असून वाकड पोलिस तपास करीत आहेत.













