- कमळाला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १२ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी–नढेनगर–कोकणेनगर महापालिका निवडणुकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार हर्षद नढे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला गती दिली आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा स्पष्ट आराखडा त्यांनी मांडला आहे. यावेळी भाजपचे उमेदवार विनोद जयवंत नढे, कोमलताई सचिन काळे आणि नीता पाडळे उपस्थित होते.
रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि स्वच्छता या प्रश्नांवर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.
भाजप सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, असा विश्वासही त्यांनी दिला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विकास उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीत कमळाला मतदान करून भाजपाच्या विकासकामांना बळ द्यावे व हर्षद नढे यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.












