न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी (दि. ६) रोजी भोसरी येथे लोकसभा निवडणुकीत झालेल्या जय-पराजयाची कारणीमिमांसा व कार्यकर्ता शिबीर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शरद पवार उपस्थितांसमोर बोलताना म्हणाले की, ”या विधानसभेला पक्षाकडून जास्तीत जास्त नव्या दमाचे चेहरे देणार आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना जुन्या नेतेमंडळीकडून पाठींबा मिळायला हवा, असे सांगत असतानाच भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी ”मी भोसरी विधानसभेला अजिबात इच्छुक नाही, कोणाला तिकीट द्यायचे त्यांना द्या”, असे वक्तव्य केले. यावर शरद पवार यांनी पलटवार करीत म्हणाले की, ”बरं वाटलं विलासराव, मी पण इच्छुक नाही, असं सांगणारे फार क्वचितच आढळतात. मीही तुमच्याकडून प्रेरणा घेवून इच्छुक नाही”, असे सांगताच सभागृहात हशांचा पाऊस पडला.
यावर विलास लांडे यांनीही खुलासा करताना सांगितले की, या विधानसभेला प्रामाणिक कामं केली तर आताही आपल्याला अडचण येणार नाही. योग्य नियोजन केलं, तर तिन्ही विधानसभेत आपला विजय होवु शकतो. आमच्यात कोणतेही मतभेत नाहीत. पराभवामुळे आम्हाला ठेचा लागल्या आहेत. विधानसभेला मी अजिबात इच्छुक नाही, कोणाला पण तिकीट द्या, त्यांचे प्रामाणिक काम करुन विजयी करु. मला भाजपकडूनही तिकिटासाठी ऑफर होती. परंतु, माझी निष्ठा. माझा नेता पवार साहेब आहेत. त्यामुळे पक्षादेश मान्य करीत, आपण सांगाल त्या उमेद्वारचे काम करून भोसरी विधानसभेवर पक्षाचा झेंडा फडकावू.














