सुरज करांडे :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १७ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार शेखर चिंचवडे यांनी सर्वाधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना शेखर चिंचवडे यांनी प्रभागातील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. “जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. हा विजय प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण संपर्क आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढील काळात प्रभागातील मूलभूत सुविधा, विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन देत, सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर खरे उतरू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.












