- राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपने केला सर..
- लोकसंपर्क व समन्वयाची ताकद ठरली निर्णायक – विनोद नढे…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जानेवारी २०२६) :- नुकत्याच पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २२, काळेवाडी येथून विनोद नढे यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रिक साजरी केली. यापूर्वी २०१२, २०१७ आणि आता २०२६ अशा तीन पंचवार्षिक निवडणुकांत ते सातत्याने विजयी ठरले आहेत.
या पंचवार्षिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या काळेवाडी प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आणत त्यांनी इतिहास घडवला. काळेवाडी हा प्रभाग पारंपरिकदृष्ट्या राष्ट्रवादीसाठी अनुकूल मानला जातो. येथे मुस्लिम मतदारांचे प्रमाण अधिक असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले परप्रांतीय नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.
मागील पंचवार्षिकमध्ये विनोद नढे राष्ट्रवादीत असताना, देशात ‘मोदी लाट’ असतानाही त्यांनी राष्ट्रवादीचे पूर्ण पॅनल निवडून आणले होते. त्यामुळे त्यांची संघटन क्षमता, स्थानिक प्रश्नांची जाण आणि सर्वसमावेशक नेतृत्व याची चर्चा कायम राहिली आहे.
नागरिकांमध्ये मिसळून काम करण्याची त्यांची पद्धत, जनतेप्रती असलेली आस्था आणि कोणताही भेदभाव न करता नागरिकांच्या समस्या सोडवण्याची तत्परता ही त्यांच्या यशाची प्रमुख सूत्रे मानली जात आहेत. सर्व समाजघटकांचा विश्वास संपादन करत त्यांनी कायमच लोकांना सोबत ठेवले—आणि याच विश्वासाच्या बळावर प्रभाग २२ मध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला, असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.












