सुरज करांडे, क्राईम प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जानेवारी २०२६) :- काळेवाडी फाटा येथे रविवारी (दि. १८) सायंकाळच्या सुमारास एका लक्झरी स्लीपर कोच वाहनाने होंडा दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अविनाश सुरेश गायकवाड (वय २५ वर्षे) या तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी लक्झरी चालक त्यांची बस घेऊन काळेवाडी फाटा ते कस्पटे वस्ती रस्त्यावरून जात होता. एसबीआई बँकेसमोर हा अपघात घडलेला आहे.
याप्रकरणी फिर्यादी महिला हिने आरोपी स्लीपर कोच वाहनावरील चालक याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि यादव हे करीत आहेत.












