मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. लक्ष्मी चौक ते आकुर्डी, रावेत या मार्गावर नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी करत सायकलपटूंना प्रोत्साहन दिले. ढोल-ताशे, टाळ्यांचा गजर आणि जल्लोषामुळे शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
या टप्प्याची सुरुवात टी.सी.एस. सर्कल, हिंजवडी येथून होऊन समारोप डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे झाला. स्पर्धेसाठी महापालिकेच्या वतीने वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य सेवा व सजावटीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते.
९१.८ किलोमीटर अंतराच्या या टप्प्यात सायकलपटूंनी वेग, कौशल्य आणि शिस्तीचे प्रभावी प्रदर्शन केले. या स्पर्धेमुळे पिंपरी-चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर वेगळी ओळख मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.












