न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जानेवारी २०२६) :- थोर स्वातंत्र्यसेनानी व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील मुख्यालयात आज (दि. २३) अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास नियोजन विभागाच्या सहमहानगर नियोजनकार श्वेता पाटील, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या तहसीलदार आशा होळकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षता विभागातील पोलीस हवालदार संभाजी खरात व पोलीस हवालदार अमर पवार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, त्यांच्या राष्ट्रसेवेला उजाळा देणारे अभिवाचन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही या महापुरुषांच्या विचारांना व कार्याला अभिवादन केले.















