न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ जानेवारी २०२६) :- चिखली परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. २२ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास नेवाळे वस्ती येथील राहत्या घरी पती-पत्नीमध्ये वाद झाला.
यावेळी पत्नीने जवळीक नाकारल्याचा राग मनात धरून पतीने तिची शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने मारहाण करत घरातील भाजी कापण्याच्या सुरीने तिच्या डाव्या हाताच्या बोटावर वार करून तिला जखमी केले.
जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
















