न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत महापौर भिकू वाघेरे (पाटील) यांच्या पुण्यतिथी निमित्त महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
आज सकाळी पिंपरीगांव येथे झालेल्या या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, नगरसदस्य नाना काटे, नगरसदस्या सुमन पवळे, उषा वाघेरे,
निकिता कदम, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसदस्य प्रभाकर वाघेरे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे तसेच मोठया संख्येने मान्यवर उपस्थित होते.














