- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत रमामंगल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष सौंदणकर यांचा पुढाकार…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २७ जानेवारी २०२६) :- देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत रस्टन ग्रीव्हज औद्योगिक कामगार सहकारी वसाहत मर्यादित यांच्या पुढाकारातुन तसेच रमामंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष सौंदणकर आणि डॉ. लाल पॅथलॅब यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत अल्पदरात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत रस्टन कॉलनी सोसायटी ऑफिस, चिंचवड येथे यशस्वीरीत्या पार पडले.

यावेळी रस्टन ग्रिव्हज औद्योगिक कामगार सहकारी वसाहतीचे अध्यक्ष दादा पवार, सचिव विलास कंक, खजिनदार अनिल कदम, कैलास काकडे, अशोक नवले, राजाराम भोसले, रंगराव पाटील, अजय कुंभार, सविता कुरळे, रमा मंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष सौंदणकर, कार्याधक्ष सुमित कांबळे, खजिनदार गणेश ओगले, फिरोज खान, प्रशांत शेनॉय, संतोष मोरजकर, महेश शर्मा तसेच रस्टन रॉयल क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य आणि डॉ. लाल पॅथलॅबचे सचिन पाटील, क्रांती काळे आदी उपस्थित होते.
या आरोग्य तपासणी शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिबिरामध्ये साखर (Sugar), हिमोग्लोबिन (Hemoglobin), युरिक अॅसिड (Uric Acid), कॅल्शियम (Calcium), कोलेस्टेरॉल (Cholesterol), टीएसएच (TSH), एचबीए1सी (HbA1c) यासह विविध महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तपासणी करून नागरिकांना आजार प्रतिबंध, आहार व जीवनशैलीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
संतोष सौंदणकर म्हणाले, “प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याणाची जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अशा तपासणी शिबिरांच्या माध्यमातून आजारांचे लवकर निदान होऊन नागरिक निरोगी जीवन जगू शकतील, हाच आमचा उद्देश आहे. पुढील काळातही रमामंगल फाउंडेशनच्या माध्यमातून असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”
या शिबिरासाठी सुमित कांबळे, गणेश ओगले, प्रशांत शेनॉय यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरामुळे अनेक नागरिकांना वेळेवर तपासणी व योग्य सल्ला मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. नागरिकांनी आयोजकांचे आभार मानत अशा उपक्रमांची गरज कायम असल्याचे मत व्यक्त केले.

















