सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ जानेवारी २०२६) :- क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल, रहाटणी, येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी नगरसेविका निर्मला कुटे व वाडिया कॉलेजचे प्राचार्य वसंत चाबुकस्वार, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, विशाल भालेराव, स्वप्नील भालेराव युवराज प्रगाणे सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम मुंडे, हर्षवर्धन कांबळे, पालक, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व सूत्रसंचालनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड सादर केली. राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व संविधानाचे वाचन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला.
इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर रिमिक्स गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दहावीच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला तसेच संघ खेळातील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचे प्रेरणादायी भाषण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरले.
पूर्वप्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी फॅन्सी ड्रेस सादरीकरण केले. यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी “मेड इन इंडिया” या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केले. विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून देशभक्तीपर भाषणे केली. देशभक्तीपर नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या शेवटी समृद्धी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

















