न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हेंना शिरुर मतदारसंघातील जनतेनं खासदार केलं.
त्यानंतर आज पहिल्यांदाच कोल्हे यांनी लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत पाऊल ठेवलं आहे. संसदेत जाताच कोल्हे यांनी सर्वप्रथम तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला आहे. तसेच शिवराज्याभिषेकदिनी संसदेत आपलं पाऊल पडल्याचेही कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन म्हटले आहे.
कोल्हे निवडून आल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या भावना वाढल्या आहेत. ते येत्या पाच वर्षांत शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना दिलेली विकासात्मक आश्वासनं पूर्ण करतील, अशी आशा करूयात.















