पिंपरी :- पवारांची तिसरी पिढी राजकारणात उतरण्यासाठी तयार झाली आहे. अजित पवार यांचे पूत्र आणि शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत. २०१४ साली राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते तिसऱ्या नंबरवर राहिले होते.
दरम्यान, अजित पवार यांनी पार्थला गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय केल्याची चर्चा आहे. स्वतः पार्थ शरद पवारांसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतात.