- त्यांचा घातपाताचा तर, प्रयत्न नव्हता ना?…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ मार्च २०२६) :-पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा शस्त्र वापरण्याचा मनाई आदेश धुडकावत तळेगाव परिसरात देशी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. खुलेआम शस्त्रे बाळगली जात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.या घटनेमुळे आरोपींचा घातपाताचा तर प्रयत्न तर नव्हता ना? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणामुळे पोलीस अलर्ट झाले असून तळेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
दरम्यान (१० मार्च) मंगळवारी रात्री जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा परिसरात मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ही कारवाई केली. एका बिझनेस सेंटरसमोर पार्किंगजवळ संशयास्पद हालचाल करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तपासात सरदार अकबर सय्यद (वय २७), विशाल नाना कडेकर (वय ३५) व प्रशांत बबूशा सोनवणे (वय २८) यांच्या ताब्यातून तीन लोखंडी देशी पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि बालवडकर करीत आहेत.












