सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ मार्च २०२६) :-जुना पुणे-मुंबई महामार्गावर निगडी येथील एसटी स्टँडसमोर रस्ता ओलांडणाऱ्या एका ४८ वर्षीय व्यक्तीच्या वडिलांना अज्ञात दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. या अपघातात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले असून, धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ( १ मार्च ) रोजी रात्री २:३० वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी राहुल उत्तम ढाणे यांचे वडील उत्तम मारुती ढाणे हे रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. एका अज्ञात मोटारसायकल स्वाराने वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, अतिवेगात आणि बेशिस्थपणे वाहन चालवून उत्तम ढाणे यांना जोराची धडक दिली.
या प्रकरणी राहुल ढाणे यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार घंटे करत आहेत.












