न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१२ मार्च २०२६) :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवन, वल्लभनगर आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते. दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, लोकाभिमुख धोरणे आणि विकासाभिमुख विचारांच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला.
कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.












