- पीसीएमसी टॉप १० पुरस्कार वितरण सोहळा; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१२ मार्च २०२६) :- पत्रकारिता आणि साहित्याचा घनिष्ठ संबंध असून पत्रकारांनी व्यापक वाचन करून मोजके आणि सकस लेखन केले पाहिजे. चुकीवर प्रहार आणि चांगल्या कार्याचे कौतुक करण्याची भूमिका पत्रकारांनी घ्यावी. पत्रकारिता संपली तर समाज संपेल, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.
अखिल मराठी पत्रकार संस्था महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित “पीसीएमसी टॉप १० पुरस्कार २०२६” वितरण सोहळ्यात ते बोलत होते. खराळवाडी, पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
महापौर रवि लांडगे यांनी पत्रकारांनी चुका निदर्शनास आणून दिल्यास त्यात सुधारणा केल्या जातील, असे सांगितले. उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी साहित्य व संस्कृती टिकली तरच समाज टिकेल, असे मत व्यक्त केले.
या वेळी पत्रकारिता क्षेत्रात अविनाश चिलेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना “पीसीएमसी टॉप १०” पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमास अनेक मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.












