न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- चिंचवडच्या श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा १००% निकाल लागला आहे. १० वी बोर्ड परीक्षेत विद्यालयाचे ६७ विद्यार्थी ९०% टक्के पेक्षा जास्त गुणांनी घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाले आहेत. तसेच १६४ विद्यार्थी ७५% ते ९०% टक्के दरम्यान गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातून प्रथम सहा क्रमांकाचे मानकरी :-
१) प्रणन इंदोरे ९७.८०%
२) वैष्णवी भोर ९७.४०%
३) गौरी पाटील ९६.००%
४) साक्षी पवार ९५.८०%
५) अक्षदा घाडगे ९५.८०%
६) मेघना काजुलकर ९५.६०%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब जाधव, संचालक अमित बच्छाव, संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षकवृंद परीवार व आदींनी अभिनंदन केले आहे.











