न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीची प्रदेश कार्यकारणी बैठक “वसंत स्मृती भवन कार्यालय दादर, मुंबई” येथे संघटनमंत्री मा. विजयदादा पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष संजय केनेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ सदस्य दीपक ढाकणे, प्रदेश सरचिटणीस संजय जोरले, प्रमोद जाधव, केशव घोळवे, प्रदेश सचिव हनुमंत लांडगे, सहसंयोजक गणेश ताठे, प्रितिताई व्हिक्टर तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, तालुका अध्यक्ष, तालुका सरचिटणीस व आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मा. केनेकर साहेबांनी पूर्ण पदाधिकारी यांच्याकडून लोकसभा २०१९ मध्ये केलेल्या कामाचा सर्वांकडून आढावा घेतला व सर्वाचे अभिनंदन केले. तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कामगार आघाडी नव्या जोमाने, भाजपाच्या उमेदवारसाठी रात्र, दिवस मेहनत करेल, असे आश्वासन यावेळी सर्व पदाधिकारी यांनी दिले.
प्रदेशाध्यक्ष संजय केनेकर यांच्या संकल्पनेतुन राज्यातील संघटीत व अंसघटीत क्षेत्रांतील छोटे व्यवसायिक, कारागीर, कामगार यांची घरोघरी जाऊन (विहीत नमुन्यात) माहीती संकलन करुन त्यांना राज्य / केंद्र सरकारच्या विविध योजनाचा लाभ मिळवून देण्याच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानुसार सर्वांना फार्म चे वाटप करण्यात आले.
तसेच पुणे, भोसरी, पिंपरी, चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील विविध कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद, कोर्ट केस, वेतन करार, प्रलंबित आहेत. त्यात प्रदेश भाजपा कामगार आघाडीने लक्ष घालावे, अशी मागणी हनुमंत लांडगे यांनी केली. याबाबत मा. मुख्यमंत्री, कामगार मंत्री, स्थनिक आमदार यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे अश्वासन प्रदेशाध्यक्ष संजय केनेकर यांनी दिले.
सर्व पदाधिका-याचे कामकाज व प्रश्न जाणून घेऊन बैठकीची सांगता झाली.















