न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. २१ मार्च २०२६) :- आळंदी परिसरातील शिवसाई लॉज येथे सुरू असलेल्या देहव्यापारावर पोलिसांनी छापा टाकत एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई १९ मार्च रोजी रात्री उशिरा आळंदी फाटा, कुरुळी येथे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक जाधव (वय २५), लॉज मॅनेजर, याने चार पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून तो स्वतःची उपजीविका करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलीस अधिक तपास करत असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.








