न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. २१ मार्च २०२६) :- देहूरोड परिसरातील साईनगर येथे जुन्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
वेलफ्रेड स्टिवन (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या दुकानातून घरी जात असताना आरोपींनी अचानक हल्ला चढवला. धारदार हत्याराने वार करत त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत केली. तसेच पळून जात असताना आरोपींनी दगडफेक करून त्यांच्या डोक्यालाही जखमी केले.
हा हल्ला फिर्यादींच्या चुलत भावासोबत असलेल्या जुन्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता व हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.








