न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २५ मार्च २०२६) :- हिंजवडी परिसरात ऑनलाईन जॉबच्या आमिषाने एका ४५ वर्षीय व्यक्तीची तब्बल ५ लाख ४४० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित सिंग याने फिर्यादीशी मोबाईल व व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून अमेरिकेतील पेपाल कंपनीत ‘सिनियर डायरेक्टर’ पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर विविध कारणे सांगत व बँक खात्याचे केवायसी पूर्ण झाले नसल्याचे सांगून वेळोवेळी पैसे उकळले.
फिर्यादीकडून स्टेट बँक मॉरीशस येथील रोहित कुमार श्रीवास्तव या खातेदाराच्या खात्यात एकूण ५,००,४४० रुपये जमा करून घेतले. मात्र नोकरी न देता व पैसे परत देण्यास टाळाटाळ करत आरोपीने फसवणूक केल्याचे उघड झाले.
ही घटना दि. ०३ मार्च ते दि. २० मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घाटगे करत आहेत.








