न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० मार्च २०२६) :- वाल्हेकरवाडीत बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फिर्यादी राजू श्रीराम महतो (वय ३८) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाचा केशव मोहन महतो हा इतर सहकाऱ्यांसह घराच्या स्लॅबचे काम करत होता.
यावेळी आरोपी पुनित कुमार रामनक्षत्र शुक्ला (वय २७) फोनवर बोलत असल्याने केशव त्याला “तु येथे काम करायला आला की, फोन वर बोलायला आला, असे म्हणाला. तेव्हा आरोपीला याला त्याचा राग आल. त्याने केशव महतो याची शर्टाची कॉलर पकडली.
त्याला म्हणाला की, “मादरचोद तु ठेकेदार है क्या? तु मुझे बताने बाला कोण है?” यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या आरोपीने शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्याला तिसऱ्या मजल्यावरून त्याला खाली फेकले. या घटनेत केशवचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.








