- शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांचा महापालिका आयुक्तांना इशारा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०१ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या अस्मितेविषयी कोणीही अवमानकारक वक्तव्य करू नये, अन्यथा शिवसेना आक्रमकपणे विरोध करेल, असा इशारा शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी दिला. तसेच महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपली चूक मान्य करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बारणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. तसेच चापेकर बंधूंच्या बलिदानामुळे शहराला विशेष ओळख मिळाली आहे.
या शहराला छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभला असून औद्योगिक आणि आयटी हब म्हणून शहर झपाट्याने विकसित झाले आहे. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांसारख्या नेत्यांच्या नेतृत्वामुळे शहराची ओळख अधिक बळकट झाली आहे.










