- अहिंसा रॅली, पदयात्रा, पुरस्कार व भक्ती संध्या कार्यक्रमात जैन बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.०१ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. अहिंसा रॅली, अहिंसा पदयात्रा, अहिंसा पुरस्कार वितरण, भक्ती संध्या आणि भक्ती गीत स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त ३१ मार्च रोजी दुपारी सांगवी येथील संस्कृती लॉन येथून भव्य अहिंसा रॅली काढण्यात आली. ही रॅली सांगवी, दापोडी, नाशिक फाटा, पिंपरी, चिंचवडगाव, बिजलीनगर मार्गे भगवान पार्श्वनाथ चौक येथे संपन्न झाली. त्यानंतर भगवान महावीरांची प्रतिमा असलेली पालखी अहिंसा पदयात्रेद्वारे गदिमा सभागृहापर्यंत नेण्यात आली. “अहिंसा परमोधर्म”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या रॅलीत हजारो जैन बांधव-भगिनी सहभागी झाले होते. महिलांनी फेटे, तर पुरुषांनी टोप्या परिधान करून सहभाग नोंदवला.
अहिंसा रॅलीचा शुभारंभ चिंचवड मतदार संघाचे आमदार शंकर जगताप आणि स्थानिक नगरसेविक यांच्या हस्ते झाला. पार्श्वनाथ चौकात प्रा. प्रकाश कटारिया व प्रा. सुरेखा कटारिया यांच्या परिवाराने तसेच बिजलीनगर संघाच्या सदस्यांनी रॅलीचे स्वागत केले व अहिंसा स्तंभाला मानवंदना देण्यात आली.
यानंतर गदिमा सभागृहात जालना येथील संगीतकार मेहूल रुपडा यांचा भक्तीमय कार्यक्रम रंगला. भक्ती गीतांच्या सुरावटीत भाविक तल्लीन झाले. यावेळी अहिंसा पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला. प्राईड ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अरविंद जैन, दुबई येथील उद्योजक धीरज जैन, स्वागताध्यक्ष किरण भाई शहा, संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया, विद्यमान अध्यक्ष श्रेयस पगारिया व माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, विलास कुमार पगारिया, सुदिन खोत, सुर्यकांत मुथियान, विरेंद्र जैन, उमेश पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
हभप शालिनीताई देशमुख इंदुरीकर, आनंद पिंपळकर, मनोज देवळेकर आणि एम. ए. हुसेन यांना अहिंसा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्याध्यक्ष विजय भिलवडे, महामंत्री संदीप फुलफगर, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप भन्साळी, प्रकाश गदिया, रमणलाल शिंगवी, शांती नाथ पाटील, उपाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा, राजेंद्र कर्नावट, सह कोषाध्यक्ष तुषार मुथा, मंत्री विरेश छाजेड, सुरगोंडा पाटील, प्रचार प्रमुख संदेश गदिया, धीरज नहार तसेच सचिन कोगनाळे, स्नेहल भंडारी, मयुर पगारिया, अभिनंदन छाजेड, देवेंद्र पारख, निखिल मुनोत, शुभम कटारिया, सचिन गांधी, प्रतिकेश गांधी, सौरभ अलासे, अनिता नहार, हर्षल लुंकड, गणराज माकुडे आदींनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी, अहिंसा पुरस्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोककुमार पगारिया यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ श्वेता राठोड यांनी आणि आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष विजय भिलवडे यांनी केले.


















