न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०६ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे अॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी सार्वजनिक सुविधा उभारणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
सुमारे २ कोटी ७२ लाख रुपयांच्या या प्रकल्पात व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, योगा कोर्ट, बहुउद्देशीय मैदान, सॅन्ड पिट, अॅम्फीथिएटर, पादचारी मार्ग, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह आणि पार्किंग अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ९ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
या सुविधांमुळे युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळणार असून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील सामाजिक संवाद आणि आरोग्यदायी वातावरणाला चालना मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.













