न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०८ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. अचूक व पारदर्शक जनगणना पार पाडण्यासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण मोहीम राबवली जात आहे.
६ ते ११ एप्रिलदरम्यान विविध केंद्रांवर सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये घरगुती सर्वेक्षण, डिजिटल साधनांचा वापर आणि डेटा संकलनातील अचूकतेवर भर दिला जात आहे. जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जूनदरम्यान होणार असून, यात घरगुती माहिती संकलित केली जाणार आहे. उपायुक्त सचिन पवार यांनी जनगणना ही शहर विकासाचा पाया असल्याचे सांगितले.
तर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या प्रक्रियेमुळे शहराच्या नियोजनाला नवी दिशा मिळणार आहे.










