- मारहाण, अपघात, अंमली पदार्थ, बेकायदेशीर शस्त्रसाठा व अपहार प्रकरणांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०५ मे २०२६)……
- खेडमध्ये जमीन वादातून वृद्धावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा..
उत्तर महाळुंगे : खेड तालुक्यातील गडद, माळवाडी येथे जमीन वादातून ६५ वर्षीय गणपत शिंदे यांच्यावर मारहाण झाल्याची घटना घडली.
आरोपी सखाराम शिंदे व त्याचे दोन मुलांनी जेसीबीने जमीन सपाट करत असताना वाद निर्माण झाला. फिर्यादीने विरोध केल्याने आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मंगेश शिंदे याने दगड मारून जखमी केले, तर आमिर शिंदे याने काठीने मारहाण केली. तक्रार देण्यासाठी जात असताना जेसीबी चालकाने धमकी देत थप्पड मारली. पोलिस तपास सुरू आहे.
- मावळात जुन्या वादातून कुटुंबावर हल्ला; शिरगावात तणाव..
शिरगाव:- मावळ तालुक्यातील बेबड ओव्हळ येथे जुन्या वादातून एका कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना घडली.
दत्तात्रय सावंत यांना आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी किसन जगताप याने काठीने कपाळावर वार केला, तर दुसऱ्याने दगड मारून जखमी केले. फिर्यादीचा मुलगा व पत्नी मदतीला आल्यावर त्यांनाही मारहाण करण्यात आली. महिलांनाही मारहाण झाल्याची नोंद आहे. पोलिसांनी काही आरोपींना नोटीस बजावली असून पुढील तपास सुरू आहे.
- एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू..
शिरगाव, परंदवडी :- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ओझर्डे परिसरात भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला.
ट्रेलरला मागून आलेल्या कारने जोरात धडक दिल्याने अपघात घडला. या दुर्घटनेत सुनिता भट यांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याचे समोर आले आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
- ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; चालक फरार..
निगडी :- चिंखली येथील त्रिवेणी नगर चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली.
महेश बाबर हे दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या ट्रकने जोरात धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकाचा शोध सुरू केला आहे.
- गांजासह आरोपी अटक; देहुरोड पोलिसांची कारवाई
देहुरोड :- देहुरोड परिसरात पोलिसांनी गांजाविक्री प्रकरणात कारवाई करत एका आरोपीला अटक केली.
आरोपीकडून २४२ ग्रॅम गांजा, मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने हा गांजा दुसऱ्या आरोपीकडून आणल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हिंजवडीत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त; एक अटकेत..
हिंजवडी :- हिंजवडी परिसरात पोलिसांनी धाड टाकून १.५७ किलो गांजा जप्त केला. आरोपी संजय राय याच्याकडून सुमारे ७८ हजार रुपयांचा गांजा मिळाला.
आरोपी बेकायदेशीररित्या विक्रीसाठी हा साठा बाळगत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
- चाकणमध्ये पिस्तूल जप्त; युवक अटकेत..
उत्तर चाकण :- चाकण परिसरात पोलिसांनी कारवाई करून एक देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले.
आरोपी प्रविण प्रधान याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडे परवान्याशिवाय शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
- भोसरीत पिस्तूलसह आरोपी अटकेत..
एमआयडीसी भोसरी :- भोसरी एमआयडीसी परिसरात पोलिसांनी कारवाई करत गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले.
आरोपी सचिन गायकवाड याच्याकडून सुमारे ४० हजार रुपयांचे पिस्तूल जप्त करण्यात आले. आरोपी बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगत असल्याचे उघड झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे.
- सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ सेवन; काळेवाडीत कारवाई..
काळेवाडी :- काळेवाडी परिसरात पोलिसांनी कारवाई करत एका युवकाला अंमली पदार्थ सेवन करताना पकडले.
आरोपी अरबाज खान हा सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करताना आढळला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
- बावधनमध्ये अश्लील कृत्य; महिलेविरुद्ध गुन्हा..
बावधन :- बावधन परिसरात एका महिलेविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित महिला रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना लैंगिक हावभाव करून त्रास देत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
- माल अपहार प्रकरण; चालकाविरुद्ध गुन्हा…
उत्तर महाळुंग :- खेड तालुक्यातील भांबोली येथे माल अपहार प्रकरण उघडकीस आले आहे. टेम्पो चालक जितेंद्र यादव याने कंपनीचा माल नेण्याच्या दरम्यान ४० हजार रुपयांच्या लाकडी फळ्यांचा अपहार केल्याचे समोर आले.
स्वतःच्या फायद्यासाठी माल विकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.












