न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ मे २०२६) :- चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन महाराष्ट्र गीत व राज्यगीत सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गणेश नृत्य, लेझीम, सिलंबम व बरची या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. इतिहास व संस्कृतीवरील भाषणे आणि सामूहिक गीतांमुळे वातावरण भारावले.
मराठी चित्रपट अभिनेते अजिंक्य रमेश देव यांनी ध्वनिफितीद्वारे संदेश दिला. संस्थापक अध्यक्ष आमदार अमित गोरखे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मराठी भाषा व संस्कृती जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास विलास जेऊरकर, डॉ. प्रिया गोरखे, समीर जेऊरकर, अमोल गोरखे, गायत्री गोरखे, अनुराधा गोरखे, मृदुला गायकवाड तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.












