न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करत सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. शहरातील सार्वजनिक जागा आणि उद्याने मोकळी ठेवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. उप आयुक्त अतुल पाटील, प्रशासन अधिकारी महादेव बोरे, उप अभियंता किरण सगर, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे आणि वैभव विटकरे यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
कारवाईसाठी ५७ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, १७ अतिक्रमण पोलीस, ६ जेसीबी मशीन, ८ मजूर आणि ३ वाहन चालक तैनात करण्यात आले होते.
“सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील,” असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.














