- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ३१ मे रोजी “विचार प्रबोधन पर्व”…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२९ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक Ahilyabai Holkar यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त रविवार, ३१ मे रोजी “विचार प्रबोधन पर्व” या विशेष उपक्रमाचे आयोजन मोरवाडी चौक, पिंपरी आणि नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी येथे करण्यात आले आहे. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.
या कार्यक्रमास आयुक्त Dr. Vijay Suryawanshi, कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर व विक्रांत बगाडे उपस्थित राहणार आहेत. दिवसभर गजनृत्य, ढोलपथक, शाहिरी कार्यक्रम तसेच “सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव” सादर होणार आहे.
रात्री ९ वाजता नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे ७५ कलाकारांचे “पुण्यश्लोक” महानाट्य सादर करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.















