- आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान समारंभ उत्साहात संपन्न…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२९ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून मे २०२६ अखेर नियत वयोमानानुसार ७२ तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १६ अशा एकूण ८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयुक्त Dr. Vijay Suryawanshi यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. “सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केलेले योगदान महापालिकेच्या प्रगतीसाठी मोलाचे ठरले,” असे आयुक्तांनी सांगितले.
कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त तानाजी नरळे, किरण गायकवाड, प्रमोद जगताप, प्रफुल्ल पुराणिक, बबन झिंजर्डे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये माणिक चव्हाण, रविंद्र सूर्यवंशी, राजीव घुले, राजाराम सरगर, बुधा नाडेकर, रामदास चपटे, बाळासाहेब आल्हाट, पुष्पलता महाकाळ, अंजली झगडे, श्रीकांत चौगुले, सविता म्हस्के, सुनंदा शिंदे, भारती वर्णे, संगीता वाघमारे, ज्ञानचंद भाट, सुचेता कुलकर्णी, महादेव बोरे, गोरक्ष तिकोने, रंगराव कारंडे, मंगल जाधव, उज्ज्वला जाधव, अनिल नायर, शशिकांत रिटे, राजू वेताळ, संध्या गायकवाड, मिनाक्षी लोखंडे, उमा भोगे, प्रशांत आल्हाट, केशव घाटगे, भगवान शिंगाडे, धनाजी माळवदकर, अंकुश माळी, धनाजी गावडे, हेमंत ढवळे, अनिल मोरे, आबा पाटील, हमीदसाहेब पटेल, गोरक्ष आगळे, शांताराम घारे, हनुमंत घाडगे, दत्तात्रय तापकीर, मोहनदास सर्वगोड, विठ्ठल निगडे, दिलीप गायकवाड, लक्ष्मण तिटकारे, शशिकांत शिंदे, संजीवनी पवार, नंदकुमार वाघेरे, बाळासाहेब इंगळे, नितीन काळभोर, एकनाथ वांभिरे, सावकार भिवरे, चंद्रकांत मिरजकर, राजाराम लोंढे, बाबूराव चिंचवडे, बाळू साठे, रविंद्र कुदळे, नारायण केसवड, रमेश दोरगे, रमेश देवकाते, राजू आल्हाट, छाया थोरात, शशीकला पाटील, माणिक कांबळे, मुकुंद कोंढरे, मालन ओव्हाळ, सुधीर जगताप, धनंजय ओव्हाळ, देवराम पवार, विश्वनाथ बोऱ्हाडे, दिलीप हनमंते आणि विजय जगताप यांचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांमध्ये मीरा शिंदे, विजय माछरे, प्रमिला जाधव, आशा लादे, रोशन मुजावर, सुमन ओव्हाळ, राजू लोंढे, बाजीराव कुटे, मालती वाघेरे, वैजयंती देवकर, लतिका बुट्टे, मनोहर शितोळे, महादेव तेलंगी आणि विजयमाला कांबळे यांचा समावेश आहे.















