न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार लोकसभा पराभवाच्या छायेतून बाहेर येत, विधानसभा निवडणूकीच्या कामाला वेग दिला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मुंबईत बैठकांचे सत्र सुरु आहे. येत्या विधानसभेसाठी जिल्हानिहाय पक्षाच्या कामगिरीचा आढावाही घेतला जात आहे.
याबाबत उद्या शनिवार (दि. १४) रोजी मुंबईत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी शहरातील विधानसभा मतदारसंघातील पदाधिका-यांची आढावा बैठक होणार आहे. यामध्ये आगमी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावांबाबत खल होणार आहे.
तसेच आगामी विधानसभेला पक्षाची रणनीती काय असेल? कोणत्या मतदारसंघात मित्र पक्षाला सोबत घ्यायचे? त्यांची ताकद व शहर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा कल. याबाबत शरद पवार दिशा दाखवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.















