न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी तुषार हिंगे, विधी समिती सभापतीपदासाठी अश्विनी बोबडे, महिला व बालकल्याण समिती निर्मला कुटे, शहर सुधारणा समिती राजेंद्र लांडगे यांची निवड झाल्याचे पिठासीन प्राधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त, रुबल अग्रवाल यांनी जाहीर केले.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आज शुक्रवार दि. १४ जून २०१९ रोजी सकाळी ११.४५ वा. या समित्यांसाठी आयोजित केलेली विशेष बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी या सर्वांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
नवनिर्वाचीत सभापतींचे पिठासीन प्राधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त, रुबल अग्रवाल यांनी अभिनंदन केले. यावेळी सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, मनोज लोणकर, आशा राऊत, नगरसचिव उल्हास जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते.















